वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

सकळ सखियास करित़से व

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080980 · अभंग क्र. ९९

99.
सकळ सखियास करित़से विनंती । समजावुनि द्या मज ॥
रामाचे भेटीला मन हे उदासीन । नव्हे समाधान काही केल्या ॥
व्यर्थ माझा देहे । जात असेवाया । भेटावया देवराया जिवलगा ॥
मग सकळिका मिळोनी एकरुप जाल्या । घेउनी राम आल्या घरा माझ्या ॥
बोधला म्हणे आनंद जाला । सेजे पडला राम माझा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग