तीर्थे हिंडलिया काय
98.
तीर्थे हिंडलिया काय होय फळ ।
अंतर निर्मळ नाही जव ॥१॥
यालागी निर्मळ होय चित्त येणे ।
संतांचे दर्शने घेतलिया ॥२॥
पाषाणप्रतिमा काय बोलतील ।
सुख हे देतील काय चित्ता ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचे वचने निःसंदेह ।
होईल विदेह रोकडाची ॥४॥
