धर्म अर्थ काम मोक्ष
98.
धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरु । हस्त पाद शरीर व्यथा पंगु झालो मी पुढारु ।
तिमिर आले पुंढे मायामोहो उदारु । तेणे मी जात होतो मग सहज भेटला सद्गुरु ॥१॥
धर्म जागो सद्गुरु महिमा जेंणे तुटे भवव्यथा । हाचि धर्म अर्ध काम येर ते मी नेघे वृथा ॥२॥
एक नाम कृष्ण याचे दान देई सद्गुरु । वेदशास्त्र मथन केले परि नव्हेचि पुढारु ।
शरण आले निवृत्तीराया तोडी संसारु । पाहाता इये भुवनी तुजविण नाही उदारु ॥३॥
ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझे पांगुळ । वृत्ति हे माझे ठायी हृ्दयी बुझे गोपाळ ।
शंख चक्र पद्म गदा तुष्टे ऐसा तू दयाळ । बापरखुमादेवीवरे दान देऊनि केले अढळ ॥४॥
