दही दुध चोरुनी दे सर
98.
दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसे मज सांगताती । आई मज मारुं नको । नाही नाही म्या पाहिली माती ॥१॥
ते न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । आम्ही भजूं दीनराती ॥३॥
