वोळखोनि करी संग तू न
96.
वोळखोनि करी संग तू निर्धारी ।
सुख तू अंतरी पावसील ॥१॥
हा जाण निर्धार विवेकाची युक्ति ।
न धरावी आसक्ति मनामाजी ॥२॥
सुपंथ जाणोनी सज्जनाच्या संगे ।
पावसी सर्वांगे आनंद तू ॥३॥
बहेणि म्हणे शास्त्र केले याचिलागी ।
कळावया जगी मार्गामार्ग ॥४॥
