ओंकार निजवृक्ष त्या
94.
ओंकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष । दान मागो रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष ॥१॥
झालो मी अंध पंगु । माझा कोणी न धरिती संगु ॥२॥
चालता वाट मार्गी मज कांही दिसेना । उच्चारिती नाम संतमार्गे चालिलो जाणा ॥३॥
पाहुनी पंढरी पेठ अंधपणा फिटलो । एका जनार्दनी संतपायी लीन झालो ॥४॥
