अनेक पुष्पांच्या साज
96.
अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळा विलसताती ॥१॥
रक्त पितांबर आरक्त अधर । चरणी सुंदर चा-लताती ॥२॥
रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूरपत्रवेंठी शो-भताहे ॥३॥
शिंगे रंगविती देऊनिया रंग । चालती श्रीरंग मागे मागे ॥४॥
चित्ती सर्वकाळ राहे ऐसे ध्यान । नामा ह्मणे धन्य तो़चि एक ॥५॥
