वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

शंख चक्र देवा तुज चु

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073088 · अभंग क्र. ९९

99.
शंख चक्र देवा तुज चुकलो गा तेणे दृष्‍टी आले पडळ ।
विषयग्रंथी गुंतलोंसे तेणे होतसे विव्‍हळ ।
अंध मंद दृष्‍टी झाली । गिळू पाहे हा काळ ।
अवचित दैवयोगे निवृत्‍ती भेटला कृपाळ ॥१॥
धर्म जागो निवृत्‍तीचा तेणे फेडिले पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरुप सकळ ॥२॥
तिहि लोकी विश्‍वरुप दिव्‍य दृष्‍टी दिधली । द्वैत हे हरपले अद्वैतपणे माऊली ।
उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊली । चिद्रुप दीप पाहे तेथे तनुमनु निवाली ॥३॥
दान हेचि आम्‍हा गोड देही दृष्टी मुराली । देह हे हरपले विदेहवृत्ति स्‍फुरली ।
विज्ञान हे प्रगटले ज्ञेय ज्ञाता निमाली । दृष्‍य ते तदाकार ममता तेथे बुडाली ॥४॥
प्रपंचु हा नाही जाणा एकाकार वृत्ति झाली । मी माझे हरपले विषयांध या बोली ।
उपरती सद्गुरु बोधु तेथे प्रकृत्ति संचली । शुध्‍द धर्ममार्गे पंथ हाती काठी दिधली ॥५॥
वेदमार्गे मुनी गेले त्‍याचि मार्गे चालिलो । न कळेचि विषयअंधा म्‍हणोनि उघड बोलिलो ।
चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो । ज्ञानदेव निवृत्‍तीचा द्वैत सर्व निरसलो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग