वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

पुर्वजन्‍मी पाप केले

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073087 · अभंग क्र. ९७

97.
पुर्वजन्‍मी पाप केले ते हे बहु विस्‍तारिले । विषयसुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले ।
चौऱ्यांशी लक्ष योनि फिरता दु:ख भोगिले । ज्ञान दृष्‍टी हारपली दोन्‍ही नेत्र आंधळे ॥१॥
धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्‍टी देतो त्‍याचे नाम मी उच्‍चारी ॥२॥
संसार दु:खमुळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ ।
कामक्रोध लोभशुनी पाठी लागली ओढाळ । कवणा मी शरण जाऊ आता दृष्‍टी देईल निर्मळ ॥३॥
मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्‍ट मित्र-स्‍वजनसखे हे तो सुखाची मांडणी ।
एकला मी दु:ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथे कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनि ॥४॥
साधुसंत मायबाप तिही केले कृपादान । पंढरिये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्‍नान ।
पुंडलिके वैद्यराजे पूर्वी सधिले साधन । वैकुंठीचे मूळमीठ डोळा घातले ते अंजन ॥५॥
कृष्णांजन एकवेळा डोळा घालिता अढळ । तिमिर दु:ख गेले फिटले भ्रांतीपडळ ।
श्रीगुरुनिवृत्तिराये मार्ग दाविला सोज्‍वळ । बापरखुमादेवीवरु विठ्ठल दीनाचा दयाळ ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग