वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

जंबु या द्वीपामाजी ए

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073094 · अभंग क्र. ९५

95.
जंबु या द्वीपामाजी एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्‍याचे नांव ।
चला जाऊ तया ठाया । कांही भोजन मागाया ॥१॥
विठोबाचा धर्म जागो । त्‍याची चरणी लक्ष लागो ॥२॥
ज्‍यासी नाही पंख पाय तेणे करावे ते काय । शुध्‍द भाव धरोनिया पंढरपुरासी जावे ।
इि‍च्‍छले फळ देतो यासी नवलाव ते काय ॥४॥
भक्ति आणि भावार्थाचा तेणे गुंफियेला शेला । विठोबा दाताराच्‍या घरा उचित नेला ।
उशिर न लागता जन्मा वेगळा केला ॥५॥
सुदामा ब्राम्‍हण दु:खे दारिद्रे पिडीला । मुष्‍टी पोहे घेऊनि त्‍याचे भेटिलागी गेला ।
शुध्‍द भाव देखोनिया गांव सोनियाचा दिला ॥६॥
गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेले याचे मनुष्‍यपण येणे सांडियेली लाज ।
विनवितो शिंपी नामा संत चरणींचा रज ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग