यावरी गौळणी सुंदरी ।
93.
यावरी गौळणी सुंदरी ।
नूऊनिया निजमंदिरी ।
खेळविती परमात्मया श्रीहरी ।
नाना उपचारी पूजिती ॥१॥
देऊनिया चंदनउटी ।
केशरी टिळक लाविती लल्लाटी ।
नाना सुमनहार कंठी ।
घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥
गुंफूनी सुमनटोप शिरी ।
विचित्र तुरे खोंविती वरी ।
लेवूनिया दिव्य अळंकारी ।
वस्त्रे परिधाने गौरविती ॥३॥
एकी जाणविती विंजणवारा ।
एकी चवरी विंजती सुंदरा ।
म्हणती वो नंदकुमारा ।
दासी आम्ही तुमचिया ॥४॥
शर्करा घृत परिपक्व लाडू ।
नाना स्वाद फळाचे घडू ।
आणूनिया करिती सुरवाडु ।
कृष्ण वदनी समर्पिती ॥५॥
एकी उचलूनिया कडिये घेती ।
एकी खांदिये बैसविती ।
एकी ह्रदयींची आळंगिती ।
चुंबन देती पै एकी ॥६॥
निळा म्हणे परब्रम्ह सेजे ।
आवडी घेऊनि निजती निजे ।
ऐशिया सुखाची नाचती भोजे ।
परमात्मा आप्त झालिया ॥७॥
