आता याचा संग (अर्थ)
94.
आता याचा संग (अर्थ) पुरे पुरे देवा । येऊ द्या कनवाळा तुम्हालागी ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझे तो हरि कांही न चाले ॥२॥
वारंवार करूणा करितो देवराया । का न ये कनवाळा तुम्हांलागी ॥३॥
चोखा म्हणे आता न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥
