वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

जिथुनि उग्दारु प्रसव

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090139 · अभंग क्र. ९४

94.
जिथुनि उग्दारु प्रसवे ऊँकारु । तोचि हा श्रीधरु गोकुळी वसे ॥१॥
जनकु हा जगाचा जीवलगु साचा । तो हरि आमुचा नंदाघरी ॥२॥
नमाये वैकुंठी योगीयांचे भेटी । पहाता ज्ञानदृष्टी नये हाता ॥३॥
निवृत्ति म्हणे देवा म्हणविता हे रावो । तो सुखानुभवो यादवांसी ॥४॥

अर्थ:
जो ओंमकार प्रणव जे सृष्टीचे आद्यतत्व आहे तेच श्रीधर बनुन गोकुळात वास करत आहे. जो नंदा घरी नांदतो आहे तो श्रीकृष्ण ह्या जगाचा जनक म्हणजे आहे. हे परब्रम्ह योग्यांच्या धान्यात पकडले जात नाही वैकुंठात मावत नाही व ज्ञान्यांच्या हाताला लागत नाही.निवृत्तिनाथ म्हणतात, यादव ज्याला राजा मानतात तो देव त्याच गोपाळांचा सुखानुभव आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग