मग बैसवूनिया पाटावरी
98.
मग बैसवूनिया पाटावरी ।
ताटी वाढिल्या नानापरी ।
दूध दही तूप साय वरी ।
शर्करा तेही ठेवियेली ॥१॥
कृष्ण म्हणे कालवी आता ।
जेववी मज ते वो जेविता ।
येरी म्हणे परिसे ताता ।
रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥
येरु म्हणे रसनायक ।
भिन्न कैचे वो आणिक ।
येरी म्हणे तुझी एकैक ।
नवाईच शब्दाची ॥३॥
मग कालवूनि एके ठायी ।
म्हणे कृष्णा आता घेई ।
येरु म्हणे वेगळे देंई ।
करुनिया हे ठायीचे ॥४॥
तव ते म्हणे न चले युक्ती ।
नको छळुं रे श्रीपती ।
त्यांची एकत्र करविले अंती ।
मज का म्हणसी निवडी हे ॥५॥
ऐसे कोणा आहे ज्ञान ।
मिश्रित झाले ते करी भिन्न ।
येरे पालवे झांकून ।
दाविले पदार्थ वेगळाले ॥६॥
निळा म्हणे देखोनिया माता ।
आश्रचर्य मानी ते तत्वता ।
म्हणे याचिये हाती सर्वहि सत्ता ।
आहे सकळ विश्रवाची ॥७॥
