वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

आमुचा जिवलग सांगती ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089869 · अभंग क्र. ९४

94.
आमुचा जिवलग सांगती ।
जन्मोजन्मींचा श्रीपती ।
एकीसवे एकी बोलती ।
आणि आळंगिती हदयेसी ॥१॥
नाना परीच्या विनोदवार्ता ।
सांगाती बोलती अनंता ।
तुझेनि भाग्ये भाग्यवंता ।
म्हणती आम्ही संसारी ॥२॥
कृष्णा आत्मया सुखानंदा ।
परात्परा जी आनंदकंदा ।
नित्या अचिंत्या अभेधा ।
देवत्रया तू वंदय ॥३॥
ऐसा असोनिया आम्हा आरजा ।
खेळणे झालासी आजिच्या काजा ।
धन्य आम्हीही गरुडध्वजा ।
तुझे पादपध देखतो ॥४॥
आणखीही एक नवल थोर ।
परमात्मया तू परात्पर ।
आम्हालागी रुप साकार ।
आवडी ऐसेचि धरियेले ॥५॥
कृष्णा म्हणोनिया पाचारिता ।
वो म्हणोनिया येसी धावंता ।
येरवी वेदाचियांही संमता ।
उरविसी रुप निर्धारिं ॥६॥
निळा म्हणे ऐशिया प्रेमे ।
अनुसरल्या त्या भक्तिसंभ्रमे ।
तैसेचि जाणोनिया त्या परब्रहमे ।
पुरविले त्यांचे सोहळे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग