वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 57. गौळणी दर्शन उत्सुकता

गौळणी दर्शन उत्सुकता

🙏 4. संत नामदेव · ABH-083672 · अभंग क्र. ९४

94.
गौळणी दर्शन उत्सुकता.

उठोनी प्रात:काळी गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आता ॥१॥
चला जाऊ आता पाहू गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥
तांतडीने येती नंदाचिया घरा । मुख दावी उदारा कृष्णराया ॥३॥
कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभ-ताती ॥४॥
अरुणोदय प्रभा अधरी दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥५॥
भोंवया व्यंकटा सरळ नासिक । पाहोनिया मुख सुख होय ॥६॥
लल्लाटी शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तु-रीचा ॥७॥
वैजयंती माळा किरीट कुंडले । नामयाने केले निंबलोण ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग