म्हणती कृष्ण आवडे कै
96.
म्हणती कृष्ण आवडे कैसा ।
जीवप्राण का पढिये जैसा ।
एकी म्हणती गे मानसा ।
भुलवाणाचि सुंदरपणे ॥१॥
याते पाहो जाता दिठी ।
पहाते पहाणेंचि नुरे शेवटी ।
संचरोनिया हा पाठीपोटी ।
करी आपणासारिखे ॥२॥
वेधूचि लावियेला मना ।
येणे गोविले वो लोचना ।
आमुच्या चित्ताचिया वासना ।
येणेचि हिरोनिया घेतल्या ॥३॥
वाटे तयासीचि परिचार ।
करुनी असावे निरंतर ।
क्षणही एक न व्हावा दूर ।
माया माहेर आमुचा हा ॥४॥
विनोद चर्चा याशींच करणे ।
आवडे कृष्णासी बोलणे ।
यावीण दुजे दृष्टी ॥५॥
नावडो याविण आणिकी गोष्टी ।
विश्रवा आधी हा शेवटी ।
पाहावा पोटी हेचि आवस्था ॥६॥
निळा म्हणे ऐशी कृष्णे ।
हिरोनी घेतलि यांचि मने ।
मग या राजीवलोचने ।
मांडिली विंदाने आणिकही ॥७॥
