वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

विषये पाहे विख । याच

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080979 · अभंग क्र. ९४

94.
विषये पाहे विख । याचे मानाल सुख । आवडी खाऊ जाता पुढे ।
भोगसिल दुःख । तुझे तु भोगसिल । जन पाहती कौतुक ॥
विषये पाही विख । जे जे सेवित गेले ।
बळेच उडी टाकुनी । आपण बुडाले ।
आपला गळा कापुनि ॥
आत्महत्यारी जाले । तेंव्हा कोण सोडवील । येम जाचिते जाळी ॥
विषये पाही विख । नाही हाणित लाता । कृपाळु भगवंत त्यासी वाहिला माथा ।
कळिकाळा भय नाही ते नमिती सर्वथा ॥
बोधला म्हणे विषयासि विटलो । कृपाळु त्यासी भेटलो ।
विषय जिंकोनिया पाहे । सुर पै जालो ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग