शिवादि वंदिती ज्याचे
97.
शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥
नंद पुण्याचा लेखा न कळे आह्मांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥
सनकादिक ज्याचे ध्यानी झाले पिसे । गायी चारीतसे गोकुळांत ॥३॥
गडियांसी काला वांटीत्त श्रीधर । कौतुक सुरवर पाहताती ॥४॥
नामा ह्मणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥५॥
