अढळ सप्रेम उपरति पाव
99.
अढळ सप्रेम उपरति पावो । हरि हरि घेवो तारक नाम ॥
संवगडे वागणे हरिपंथी चालो । हरि हरि बोलो दिननिशी ॥
पाहाते निमते सरे हंसगती । हरीची पंगती जेऊ बैसो ॥
ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा । संसार पिपासा दूरी करी ॥
अर्थ :
जीवाचे सर्वात जास्त प्रेम संसारात असते त्या पासुन जीव परावृत्त होवो व तारक असणारे हरिनाम घेवो. हरिनाम घेणारे संवगडी बरोबर असतील तर तो सुध्दा हरिनाम दिवसरात्र घेईल. हंसचाली प्रमाणे हरिनाम घेतले तर त्या हरिच्या पंगतीचा लाभ होतो. संसाराच्या इच्छेचा शेवट रामकृष्णनामाच्या आशेने होतो असे माऊली सांगतात.
