भिल्लणीची फळे कैशी ।
95.
भिल्लणीची फळे कैशी । चाखोनी वाहातसे देवासी ॥1॥
भावे तिची अंगिकारी । सर्वाहुनी कृपा करी ॥2॥
गुज वान्नरांसी पुसावे । राक्षसांते हो जिंकावे ॥3॥
वान्नर अवघे भुभुःकार । बोलताती रामासमोर ॥4॥
आज्ञा करावी आह्मांसी । रावण आणितो तुह्मापासी ॥5॥
तुझ्या नामच्या प्रतापे । हनुमंत गेला जी संतापे ॥6॥
सीताशुद्धि करुनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥7॥
