योगियांचे धन ते ब्रह
95.
योगियांचे धन ते ब्रह्म संपन्न । तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥
हरीरूप माये सर्वाघटी आहे । दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥
चिंति अजामेळा नाम आले मुखा । तो वैकुंठीच्या सुखा देत हरि ॥३॥
निवृत्तिचे धन जगाचे जीवन । नाम नारायण तरुणोपाव ॥४॥
अर्थ:
त्या परब्रम्हाची प्राप्ती म्हणजे महाधन मानणारे योगी त्यांना हा सहज मिळत नाही पण हा जनार्दन नंदा घरी अवचित आला आहे. जे सर्वांघटी भरलेले आहे असे ते परब्रम्ह गौळ्यांचे दुध लोणी खात आहे. त्या महापापी अजामेळा त्यांनी शेवटी घेतलेल्या नामामुळे वैकुंठाला पोहचला.तोच परमात्मा हा वैकुंठाचे सुख गोकुळात देतो आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ते नाम घेतले तर ते त्रैलोक्याला तारते ते नारायण नाम माझा ठेवा आहे.
