मृत्युलोका माझारी ग
96.
मृत्युलोका माझारी गा एक सद्गुरु साचारु । त्याचेनि गा दर्शने तुटला हा संसारु ।
पांगुळा हस्तपाद देतो कृपाळ उदारु । यालागी नांव त्याचे वेदा न कळे पारु ॥१॥
धर्माचे वस्तिघर ठाकियले बा आम्ही । दान मागो ब्रह्म साचे नेघो द्वैत या उर्मी ॥२॥
विश्रांति विजन आम्हा एक सद्गुरु दाता । सेविता चरण त्याचे फिटली इंद्रियांची व्यथा ।
निमाली कल्पना आशा इळा परिसी झगटता । कैवल्य देह झाले उपरती देह अवस्था ॥३॥
मन हे निमग्ल झाले चरणस्पर्श तत्वता । ब्रह्महंस्फूर्ति आधी भावो उमटला उलथा ।
पांगुळले गुह्यज्ञान ब्रह्मरुपे तेथे कथा । अध मग दृढ झालो निमाल्या विषयाच्या वार्ता ॥४॥
ऋध्दि सिध्दि दास्य सख्य आपेआप वोळली । दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपे लीन झाली ।
वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगुळा जीवनमार्गु सतरावी हे वोळली ॥५॥
पांगुळ मी कल्पनेचा पंगु झालो पै मने । वृत्ति हे हरपली एका सद्गुरुरुप ध्याने ।
निवृत्तीसी कृपा आली शरण गेलो ध्येयध्याने ॥६॥
