वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

सकाळी उठोनी हरिचे ना

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081004 · अभंग क्र. ९६

96.
सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा । नाम उच्चारिता तुटे पातक थारा ॥
हरिचे जे नाम ज्याच्या येईल वाचे । ते नर सदैव भाग्याचे । ते ऐक जीव दैवाचे ॥
हरिचे जे नाम जे जे उच्चारित गेले । हरिरुप होऊन ते नर वैकुंठी ठेले ॥
बोधला म्हणे देवा नाम उच्चारित गेलो । नाम उच्चारिता विठ्ठल पायी विनटलो ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग