वेदबीज साचे संमत श्र
97.
वेदबीज साचे संमत श्रुतीचे । गुह्य या शास्त्रांचे हरि माझा ॥१॥
तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु । कृष्ण मुक्ती देतु देतु जीवघाते ॥२॥
अर्जुना साहाकारी द्रौपदी कैवारी । तो विदुराचे घरी अन्न मागे ॥३॥
निवृत्तिचे धन गोकुळी श्रीकृष्ण । यादव सहिष्णु हरि माझा ॥४॥
अर्थ:
हा माझा हरि सर्व शस्त्रांचे मुळ असुन वेदांचे बीज आहे. त्या हरिला आपला जीव लावला की तो आपल्या जीवदशेतुन मुक्त करतो. तोच हरि श्रीकृष्ण बनुन गोकुळांत खेळतो आहे. तोच हरि अर्जुनाला साह्यभूत झाला, द्रौपदीचा तारणहार झाला तोच विदुरा घरी कण्या मागुन खातो. निवृतिनाथ म्हणतात, तोच हरि माझे महाधन आहे व तोच हरि गोकुळात गौळ्यांसारखा बनुन सर्वाटबरोबर सहिष्णु पध्दतीने राहात आहे.
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा अभंग क्र 98
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा । तो गौवळीयांच्या काजा तिष्टतुसे ॥
देखिले सांवळे पूजिती गोवळे । नंदाघरी खेळे स्वामी माझा ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ । योगिये चिंतित हृदयी जया ॥
अर्थ:
ज्या श्रीकृष्णाची पुजा करायची ही इच्छा ब्रह्मादिकांना आहे. तोच श्रीकृष्ण गौवळ्यांची काम करण्यासाठी तिष्टत बसला आहे. गौवळी ज्या सावळ्या परब्रह्माला पुजतात तो नंदाघरी खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्याला योगी हृदयात ज्याला जपतात ते दैवत सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.
