आपुल्या आपण सांभाळोन
99.
आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावे । आहे नाही ठावे तुम्हा सर्व ॥१॥
वायांचि करणे लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणे हे ॥२॥
अंगा नाही आले तंव ते साहाले । खादले पचले तरी ते हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचे तुम्हासी सांगणे । माझे यांत उणे काय होते ॥४॥
