वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

घरी आपुलिया मातेपाशी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089928 · अभंग क्र. ९७

97.
घरी आपुलिया मातेपाशी ।
देखोनिया मागे शशी ।
म्हणे देंईवा खेळावयासी ।
आणूनी तो मज हाती ॥१॥
येरी म्हणे परिसे ताता ।
गगनीचा तो नये हाता ।
नको छळू रे कृष्णनाथा ।
नाही तेचि मागो नको ॥२॥
येरुं म्हणे रे पैल दिसे ।
नाही त्यासी म्हणसी कैसे ।
येरे म्हणे असाध्य ते असे ।
नाही.णाचि सारिखे ॥३॥
राया घरीची संपदा ।
दुर्बळा घरी कैची सदा ।
येरु हासोनिया गदगदा ।
मुखचंद्राते दाखवितु ॥४॥
म्हणे पाहे दसवंतिये ।
हा गे जवळींच चंद्र आहे ।
तारे तुटती लवलाहे ।
षोडशकळी प्रकाशला ॥५॥
यशोदा म्हणे न कळे महिमा ।
तुझा आम्हा पुरुषोत्तमा ।
दिठावसील रे मेघ:शामा ।
नको विंदाने करु ऐशी ॥६॥
निळा म्हणे ओंवाळून ।
सांडी वरुनी निंबलोण ।
मग त्या वोसंगा घेऊन ।
म्हणे भोजन करी बापा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग