वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संत असंताचे शरीर सार

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076296 · अभंग क्र. ९३

93.
संत असंताचे शरीर सारिखे ।
भिन्नत्व वोळखे क्रियेपासी ॥१॥
काय सांगो फळ दोहीचे वेगळे ।
जाणत्यासी कळे ज्ञानदृष्टी ॥२॥
परिस आणि गार सारिखे स्वरूप ।
तेल आणि तू पाहे पा रे ॥३॥
कच आणि मनि पाहाता समान ।
अंतरिचे गुण भिन्न असे ॥४॥
खरे आणि खोटे सारिखेचि नाणे ।
तक्र-दुधी गुण वेगळाची ॥५॥
बहेणि म्हणे मैंद साधु वोळखण ।
पुढे त्याचे गुण अंगिकारी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग