आन साधने सायास । कां
98.
आन साधने सायास । कांही न करी आयास ।
नामचाचि उल्हास । हृदयी वास असावा ॥१॥
हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा ।
पायांसी केशवा । हाचि हेवा मानसी ॥२॥
जन्म देई संताघरी । उच्छिष्टाचा अधिकारी ।
आणिक दुजी थोरी । दारी परवरी लोळेन ॥३॥
नका मोकलू दातारा । विनंती माझी अवधारा ।
अहो रखुमादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥
