वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 58. आधासूर वध

आधासूर वध

🙏 4. संत नामदेव · ABH-083669 · अभंग क्र. ९८

98.
आधासूर वध

कंस धाडी अघासुर । मारी नंदाचा कुमर ॥१॥
एक ओंठ घाली खाली । दुजा मेघाच्या मंडळी ॥२॥
गाई गोपाळ उदरी । देवा कळले अंतरी ॥३॥
आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥४॥
क्षणार्धेंची मारी । भक्तजनाचा कैवारी ॥५॥
भेणे गोपाळ पडिले । कृपा दृष्टि अवलेकिले ॥६॥
तेज अद्‍ भुत निघाले । कृष्णमुखी प्रेवशले ॥७॥
भक्तासी रक्षीत । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग