संतसंगतीचा महिमा अद्
97.
संतसंगतीचा महिमा अद्भुत ।
होती ज्ञानवंत सत्त्वगुणी ॥१॥
यालागी सेवावे संतांचे चरण ।
स्थिर होय मन येक क्षणे ॥२॥
संतांचे बोलणे आइकता कानी ।
ब्रह्मरूप जनी होय सर्व ॥३॥
बहेणि म्हणे संतसर्शनेचि मोक्ष ।
अनुभव प्रत्यक्ष पाहे याचा ॥४॥
