परदारा परधन परनिंदा
32.
परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनिया भजन हरीचे करा ॥१॥
सर्वांभूती कृपा संताची संगती । मग नाही पुनरावृत्ती जन्म मरण ॥२॥
शास्त्रांचे हे सार वेदांचे गव्हार । ते नाम परिकर विठोबाचे ॥४॥
नामा म्हणे न लगे साधन आणिक । दिधली मज भाक पांडुरंगे ॥५॥
