भगवद रूपवर्णन.
32.
भगवद रूपवर्णन.
कोटिशा आदित्य गोठे एके ठायी । तेजे दिशा दाही उजळल्या ॥१॥
घाबरा होवोनी वसुदेव पाहे । ह्लदयी आश्चर्य करी-तसे ॥२॥
मुकुटावरी रत्न नक्षत्रांचा मेळा । भाळी शोभे टिळा केश-राचा ॥३॥
व्यंकटा भृकुटी कमलाकार नेत्र । नासीक विचित्र शुक-चंचू ॥४॥
विद्युल्लते ऐसी झळकती कुंडले । अधर कोंवळे अरुणोदय ॥५॥
कंबुग्रीव कंठ ह्लदयी वत्सलांच्छन । ब्रह्मयाची सीण न कळे अंत ॥६॥
चतुर्भुज शंखचक्रगदापद्म । चिमणा मेघ:श्याम वर्ण ज्याचा ॥७॥
कौस्तुभ निर्भळ वैजयंती माळा । कासे सोनसळा हाटवर्ण ॥८॥
रुणझुण रुणझुण वाजताती वाळे । आरक्त वर्तुळ नखी शोभा ॥९॥
ध्व-जवज्रांकुश जैसी रातोत्पळे । नामा म्हणे डोळे दिपताती ॥१०॥
