वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

धीराचे पै धीर उदार त

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090085 · अभंग क्र. ३३

33.
धीराचे पै धीर उदार ते पर । चोखाळ अमर अभेदपणे ॥१॥
ते हे चतुर्भुज कृष्णरुपे खेळे । माजि त्या गोपाळे छंदलग ॥२॥
किडाळ परते चोखाळ अरुते । मी माझे हे कर्ते तेथे नाही ॥३॥
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ । सर्वत्र गोपाळ सखा आम्हा ॥४॥

अर्थ:
धीरगंभीर असलेले परमतत्व उदारांचा राणा आहे प्रेमसुखाची जगतावर बरसात करत आहे. असे हे परब्रह्म गुणातीत निर्दोषस्वरुपात एकत्वाचे दर्शन घडवत आहे. ते चतुर्भुज परमतत्व कृष्णरुप गोपाळांना आपल्या कृष्णरुपाचा छंद लावुन त्यांच्या सोबत खेळत आहे. कोणत्याही वाईटाचा डाग नसलेले चोख निर्मळ असलेले हे ब्रह्म या ठिकाणी मी माझे असा कोणताही भेद करत नाही. व कोणत्याही कर्तेपणाचा लेश लाऊन घेत नाही.निवृत्तिनाथ म्हणतात की धर्माचा शुध्द विचार चोखपणे करुन असलेला तो गोपाळ माझा सखा आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग