तुझ्या निजरुपाकारणे
32.
तुझ्या निजरुपाकारणे । वेडावली षड्दर्शने ॥1॥
परि सोय न कळे त्यासी । समीप असता देवासी ॥2॥
चारीश्रमे हो कष्टती । वेदशास्त्रे धुंडाळिती ॥3॥
परि कवणे रीति तुला । न जाणवे जी विठ्ठला ॥4॥
तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥5॥
