कोटी मदनाचा बाप।
32.
कोटी मदनाचा बाप।
प्रभा फांकली तेज अमूप।
भूषणे विराजली दिव्य स्वरुप।
नंदे पाहिला निज नयनी ॥१॥
मग याशोदेपाशी आणिला।
म्हणे हा वसुदेव दिधला।
येरी म्हणे हा चोरियेला।
कोणाचा तानुला न कळे हे ॥२॥
वसुदेव सदाचा भिकारी।
बंदी कंसाचिये चिरकाळ वरी।
बालक सुलक्षण हा निर्धारी।
असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥
येरु म्हणे आहे पोंटीचा।
आत्मा जिवलगु हा आमुचा।
नाही वो आणिका लोकाचा।
म्हणोनिया देतो तुम्हाप्रती ॥४॥
येरो म्हणे आमुचे कन्यारत्न।
याच्या पालटा न्या करा यत्न।
कंसा पुसताचि तया दाउन।
चुकवा अरिष्ट सकळाचे ॥५॥
यावरी कृष्णाते निरवून।
वसुदेव निघाला माया घेउन।
पुढती बंधने पावला बंदिखान।
विचित्र विदांन शक्तीचे।६॥
श्रीकृष्णदेवेसी अंतरावो।
होताचि प्राप्त झाला मोहो।
अविद्यायोगे चिंताप्रवाहो।
महार्णर्वी पडियेला ॥७॥
निळा म्हणे हिताहित।
नाठवेचि काही झाला भ्रांत।
मायादेवाची हा प्रघात।
झाला आप्त वसुदेवा ॥८॥
