नीळवर्ण रजे नीळवर्ण
32.
नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे ।
निळीमा सहजे आकारली ॥
नीलप्रभा दिसे नीळपणे वसे ।
निळिया आकाशे हारपले ॥
निळेपण ठेले निळिये गोविले ।
निळेपण सोविळे आम्हा झाले ॥
ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोंवला ।
कृष्णमूर्ति सावळा हृदयी वसे ॥
अर्थ :
त्या घननिळ्याच्या पायीच्या धुळी मनालाही निळेपण लाभले आहे. व ती सहज मनात आकारली. त्याचा निळा रंग असल्याने त्याची निलप्रभा पसरली आहे. व त्यात आकाश हारपले आहे. त्या देवाच्या निलवर्णामुळे भक्त ही निळेपणात न्हाले व त्यामुळे ते पवित्र झाले. मी त्याला परब्रह्मात ही निळेपणे पाहिला व ती कृष्णमूर्ती सावळेपणेच हृदयात वसली असे माऊली सांगतात.
