विश्रामधर्मता आश्रमप
34.
विश्रामधर्मता आश्रमपूर्णता । आपरुप कथा निमे जेथे ॥१॥
ते हे कृष्णबाळ गोपिकांसि खेळे । नंदाघरी सोहळे आनंदाचे ॥२॥
कथा त्या कथिता पूर्ण त्या मथिता । अरुप अच्युता सर्व असे ॥३॥
निवृति समाधान कृष्ण हे चोखडे । मनोनिग्रह खोड चरणी गोवी ॥४॥
अर्थ:
धर्माची विश्रांती व आश्रम व्यवस्थेतेची पूर्णता ह्याच्याच ठिकाणी होत असते. अशा त्या परमात्म्याने आत्मरुपाचे ज्ञान दिले तेंव्हा स्वस्वरुप त्यात मावळुन गेले. तेच हे परमात्मस्वरुप कृष्णस्वरुपात गोपिंकांबरोबर नंदाच्या घरात खेळले तेंव्हा नंदाचे घर आनंदात न्हाले. अशा त्या अरुप, अकर्तुम परमात्म्याची कथा केली तर करणाऱ्याला पूर्णत्व मिळते. निवृतिनाथ म्हणतात मनोनिग्रह करुन मी ह्याच्या चरणी एकरुप झाल्यावर मला त्यांचे शु्ध्द स्वरुप दिसले त्यामुळे मला समाधान प्राप्त झाले.
