वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

मग बोले मंजुळा उत्तर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089878 · अभंग क्र. ३१

31.
मग बोले मंजुळा उत्तरी।
मज न्या जी गोकुळाभितरी।
ठेवुनी नंदयशोदेच्या घरी।
तुम्ही यावे तेच क्षणी ॥१॥
ऐकोनी तयाचे उत्तर।
वसुदेव विस्मित आणि चिंतातूर।
म्हणे कैसा करावा विचार।
बंधने गोविले मजलागी ॥२॥
ऐशिया मोहे त्या कवळित।
तव तुटली बंधने झाला मुक्त।
म्हणे आता हा कृष्णनाथ।
नेईन गोकुळात ठेवीन ॥३॥
मग घेऊनिया निज बोधेशी।
आला वासुदेव गोकुळाशी।
देऊनिया त्या नंदापाशी।
म्हणे हे स्वीकारा बाळक ॥४॥
जन्मले देवकीचिये उदरी।
परि हे ठेविता नये घरी।
अहं कंसाचे भय भारी।
यालागी तुम्हा हे कृष्णापर्ण ॥५॥
ऐशिया उत्तरी बोलिला।
बाळक त्यापाशी दिधला।
उघडोनि नंदे जो पाहिला।
तव तो देखिला चतुभुर्ज ॥६॥
निळा म्हणे वोळले भाग्य।
घरा आले पुसत चांग।
उध्दरावया सात्विक जग।
केला वास तया घरी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग