अकराच्या माथा नकार ब
33.
अकराच्या माथा नकार बैसला ।
लकार भारला मिथ्या पाही ॥१॥
ऐसा तो उमज नाही या मानवा ।
उगाच वणवा लागे देही ॥२॥
विषयी गुंतला, नाही केले ध्यान ।
पातकीं दुर्जन अविचारी ॥३॥
सांवता म्हणे भजन करावे देवाचे ।
योगयाग तयांचे कष्ट बहु ॥४॥
