निगमाचे शाखे आगमाचे
33.
निगमाचे शाखे आगमाचे फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचे गुज । सकळा निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तू जगाचे जीवन । संतांचे मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
