वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

निळिये पेरणी निळियेप

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074989 · अभंग क्र. ३३

33.
निळिये पेरणी निळियेपणी खाणी ।
गुणाची लेणी कृष्णवर्ण ॥
नवलाव गे माय नवल चोज ।
निळी निळिमा काज आकारले ॥
नीळवर्ण तनु नीळवर्ण गुणू ।
निळी निळिमा पूर्ण हृदयी नांदे ॥
ज्ञानदेवी लीला मन मनी निवाला ।
निळिये अवलीला हरपला ॥

अर्थ :
त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरुपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली. त्या निलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहेत. आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे. व सर्व जगच निळे दिसत आहे. त्याचे शरिर निळे त्याचे गुण निळे संपुर्ण हृदयी निळेपणे आले आहे. त्याच्या निळवर्ण लीलेने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग