वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

आपुलेनि हाते कवळु सम

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090039 · अभंग क्र. ३१

31.
आपुलेनि हाते कवळु समर्पी । ब्रह्मार्पण मुखी ब्रह्मपणे ॥१॥
सोपान सावता निवृत्ति निधान । यासि जनार्दन कवळ देतु ॥२॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरी । सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥३॥
देऊनी हस्तक पुशी पीतांबरे । पुसतसे आदरे काय आवडे ॥४॥
राहीरखुमाबाई कासवी तुषार । अमृत सार सर्वाघटी ॥५॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता । हरि कवळु देता तृप्त जाले ॥६॥

अर्थ:
श्री विठ्ठल आपल्या हातानी भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास घालुन तो ब्रह्मार्पण करत आहे. सोपान सांवता निवृत्ती ह्यांसर्व भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास स्वतः श्रीहरि भरवत आहे. श्रीहरीने दिलेल्या ह्या काल्याच्या प्रसादामुळे त्यांना अंतर बाह्य ब्रह्मस्वरुप दिसायला लागले. मग देव ह्या भक्तांच्या मस्तकावर हात ठेऊन त्यांचे मुख स्वतःच्या पीतांबराने त्यांचे मुख पुसुन त्यांना लडिवाळपणे विचारत आहे की तुम्हाला अजुन काय हवे आहे. जशी कासवी आपल्या दृष्टीने तिची पिल्ल पाळते तश्या प्रेम वात्सल्याने राही रखुमाई काला प्रसंगी आपल्या भक्तांना प्रेम पान्ह्याचे अमृत सार रुपात देत आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात देवांने आपल्या हाताने काल्याचा घास दिल्याने मी, विसोबा खेचर, सोपानदेव व सांवतामहाराज तो प्रसाद घेऊन तृप्त झालो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग