वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 2. विठ्ठल महात्म्य

पंढरी सांडोनी जाती व

🙏 16. संत जनाबाई · ABH-073788 · अभंग क्र. ३३

33.
पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यासी आहे तेथे ॥1॥
तया पंचक्रोसी ह्मणती मरावे । मरोनिया व्हावे जीवनमुक्त ॥2॥
नको गा विठोबा मज धाडू काशी । सांगेन तुजपाशी ऐक आता ॥3॥
मरचीमान्न वेरण स्तंभी घाली । घालोनिया गाळी पापपुण्य ॥4॥
जावोनिया तेथे प्रहर दोन रात्री । सत्य मिथ्या श्रोती श्रवण करा ॥5॥
आई आई बाबा ह्मणती काय करु । ऐसे दुःख थोरू आहे तिथें ॥6॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥7॥
लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील यातना नको देवा ॥8॥
न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादुःखे ॥9॥
अमरादिक थोर थोर भांबावले । भुलोनिया गेले मुक्तिसाठी ॥10॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागता पायांसी संताचिया ॥11॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरी । आणि भीमातीरी मोक्ष आला ॥12॥
सख्या पुंडलिका लागताचि पाया । मुक्ति म्हणे वांया गेले मी की ॥13॥
घर रिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धाव घाली ॥14॥
मोक्ष सुखासाठी मुक्ति लोळे । बी नेघे कोणी कदा काळी ॥15॥
मोक्ष मुक्ति जिंही हाणितल्या पायी । आमुची ती काय धरिती सोयी ॥16॥
समर्थाचे घरी भिक्षा नानापरी । मागल्या पदरी घालिताती ॥17॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सांराजाचे सुख तुझे ॥18॥
जनी ह्मणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥19॥.

 

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग