निरंतर तुम्ही करावा
33.
निरंतर तुम्ही करावा विचार । भवाब्धी चा पार होय कैसा ॥१॥
जन्म गेले वाया विषयाचे संगे । भुलले वाउगे माया मोहे ॥२॥
अवघा करीता संसाराचा धंदा । वाचे वदा सदा हरीनाम ॥३॥
सर्वभावे एका विठोबाते भजा । आर्ते करा पूजा हरीभक्त ॥४॥
सर्व सुख होई तुम्हाला आपैते । न याल मागुते गर्भवासा ॥५॥
नामा म्हणे तुम्ही विचारूनी पहा । सर्व काळ रहा संत संगे ॥६॥
