संसार सागर भरला दुस्
34.
संसार सागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरळा संत ॥१॥
कामाचिया लाटा अंगी आदळती । नेणो गेले किती वाहुनिया ॥२॥
भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा । एक पडिले घरा चौऱ्यांशीच्या ॥३॥
नावाड्या विठ्ठल भवसिंधु तारू । भक्ता पैल पारू उतरितो ॥४॥
नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचे । भय कळीकाळाचे नाही तुम्हा ॥५॥
