जोडोनिया हात वंदिला
32.
जोडोनिया हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥
सर्वसुखाहूनि हेचि वाटे गोड । संसाराची ओढ मोडवेना ॥२॥
मृग पक्षीयाचे कळावे बोलणे । सर्व कांही येणे कार्यसिद्धी ॥३॥
इतुकी आहे हो माझी ही वासना । पुरवूनि स्वस्था - ना जावे तुम्ही ॥४॥
नामा ह्मणे ज्याची जे कांही वासना । तेचि पुढे जाणा उभी ठाके ॥५॥
