नवल ती कळा दावी गोपि
32.
नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरी आपणची ॥२॥ द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥ एका जनार्दनी धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥