भक्तीचिया पोटी बोध क
34.
भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥१॥
ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीला माथा ॥२॥
काय महिमा वर्णू आता सांगणे किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥३॥
राही रखुमाई दोही दो बाही । मयूर पिच्छ चामरे ढाळिती ठायी ठायी ॥४॥
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥
