वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

धन्य देहु गांव पुण्य

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072730 · अभंग क्र. ३४

34.
धन्य देहु गांव पुण्यभूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥२॥
कर कटी उभा विश्‍वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी ॥३॥
गरुडपारी उभा जोडूनिया कर । अश्वत्थ समोर उत्तरामूख ॥४॥
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगा नीर इंद्रायणी ॥५॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचे बन । तेथे अधिष्ठान सिद्धेश्र्वर ॥६॥
विघ्नराज द्वारी बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारी सहित दोघे ॥७॥
तेथे दास तुका करितो कीर्तन । हृदयी चरण विठोबाचे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग